बुधवार(दि.20) पासून महाविद्यालय सुरु; जिल्हाधिकारी यांचे आदेश

 


अकोला,दि.19(जिमाका)- कोविड-19 चा प्रार्दुभावशासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अटी व शर्तीचे पालन करुन जिल्ह्यातील  सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्‍वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे व त्‍यांचे संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग 50 टक्के क्षमतेने बुधवार दि. 20ऑक्‍टोंबर पासून तर वसतीगृहे टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने सुरु  करण्‍याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

अटि व शर्ती : 18 वर्षावरील विद्यार्थी ज्‍यांनी कोविड-19 च्‍या लसीचे  दोन्‍ही डोस घेतलेले आहेत, तेच विद्यार्थीविद्यार्थींनी विद्यापीठ व महाविद्यालयात प्रत्‍यक्ष उपस्थित राहू शकतील. ज्‍या विद्यार्थी किंवा विद्यार्थींनीनी कोविड-19 ची लस घेतलेली नाही,  त्‍यांच्‍याकरिता विद्यापीठाने संबंधीत संस्‍थाचे प्रमुख किंवा महाविद्यालयाचे  प्राचार्य यांचे मदतीने स्‍थानिक जिल्‍हा प्रशासनाशी  समन्‍वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवून लसीकरण प्राधान्‍याने पूर्ण करुन घ्‍यावे.  तसेच  विद्यापीठमहाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्‍तर कर्मचाऱ्यांचे देखील लसीकरण प्राधान्‍याने करुन घ्‍यावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ