अतिवृष्टी नुकसानग्रस्तांसाठी ८४ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त ;तात्काळ प्राप्त मदतीचे वाटप करा- पालकमंत्री ना. बच्चू कडू

 अकोला,दि.२३(जिमाका)- जिल्ह्यात जुन, जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टिमुळे व पुरस्थितीमुळे  शेती व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी मदत अनुदान म्हणून जिल्ह्यास ८४ कोती २६ लक्ष रुपयांचा मदत निधी  जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला आहे. या निधीचे शेतकऱ्यांना लवकरात लवकर वाटप करावे असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज जिल्हा प्रशासनास दिले.

यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदत पुनर्वसन कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार,  अकोला तालुक्यासाठी ३२ कोटी ७१ लक्ष, बार्शी टाकळी तालुक्यासाटी १६ कोटी ६७ लक्ष. अकोट ४ कोटी १० लक्ष, तेल्हारा एक कोटी ५१ लक्ष , बाळापूर १४ कोटी ६३ लक्ष, पातूर १४ कोटी २१ लक्ष, मुर्तिजापूर ४३ लक्ष असे एकून ८४ कोटी २६ लक्ष रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ