कोविडःआरटीपीसीआर मध्ये तिघे पॉझिटीव्ह तर रॅपिड ‘निरंक’
अकोला,दि.22(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 188 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 185 अहवाल निगेटीव्ह आले, तर तीन जण पॉझिटीव्ह आले तर तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.21) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल
पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता
एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57881(43274+14430+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय
सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर तीन + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण
पॉझिटीव्ह तीन
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 327153 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक
तपासणीचे 323519 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय
कर्मचाऱ्यांचे 3232 नमुने होते. आजपर्यंत एकूण 327153 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 283879 आहे, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
तिघे
पॉझिटीव्ह
आज दिवसभरात तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन पुरुष व एका महिलेचा समावेश
असून ते अकोला ग्रामिण, मुर्तिजापूर
व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवाशी आहे. तसेच रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यातही कुणाचाही अहवाल
पॉझिटीव्ह आला नाही, याची नोंद घ्यावी.
तिघांना डिस्चार्ज
आज दिवसभरात होम आयसोलेशन येथील तिघांना डिस्चार्ज देण्यात
आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात
आली.
13 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57881(43274+14430+177) आहे. त्यात 1139
मृत झाले आहेत. तर 56729 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून
सद्यस्थितीत 13 जणांवर
उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा
रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 104 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह
कोरोना संसर्ग
चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.21) दिवसभरात झालेल्या 104 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाहीअहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल
दिवसभरात अकोला ग्रामिण येथे सात, मुर्तिजापूर येथे 16 तर अकोला महानगरपालिका
येथे 50, शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयात 29, हेगडेवार लॅब येथे दोन चाचण्या झाल्या
त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे एकूण 104 चाचण्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे जिल्हा
रुग्णालयाने कळविले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा