जि.प.व पं.स.पोटनिवडणुक: मतदान क्षेत्रात स्थानिक सुटी जाहीर

 


अकोला, दि.1(जिमाका)-  जिल्हा परिषद व पंचायत समिती येथील रिक्त पदाच्या पोट निवडणूक  5 ऑक्टोबर रोजी होत आहे. या ठिकाणी मतदारांना मतदान करता यावे, यासाठी  संबंधित मतदान क्षेत्रात स्थानिक सुट्टीचे आदेश  जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

उर्जा व कामगार विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील जिल्‍हा परिषद पंचायत समिती रिक्‍त पदाच्‍या पोट सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रमानुसार निवडणुक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी, तसेच कामानिमित्‍त निवडणुक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्यांना निवडणुकीच्‍या दिवशी मतदानाचा हक्‍क बजावण्‍यासाठी मंगळवार दि. 5 ऑक्‍टोबर रोजी भरपगारी सुट्टी देण्‍यात येत आहे. तसेच अपवादात्‍मक परिस्थितीत कामगार,अधिकारी, कर्मचारी इत्‍यादींना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्‍य नसेल अशा मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्‍क बजावण्‍यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देण्‍यात येत आहे. कामगारांना मतदान करता येण्‍याचे दृष्‍टीने त्‍यांना कामाच्‍या वेळात दोन तासाची सवलत सर्व खाजगी संस्‍था, व्‍यापारी संस्‍था, दुकाने व कारखानदार यांनी दयावी, असे आवाहन करण्‍यात येते आहे.  

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन