विधीमंडळाच्या रोजगार हमी समितीचा सोमवारपासून (दि.११)जिल्हा दौरा

 अकोला, दि.९(जिमाका)-  राज्य विधीमंडळाची रोजगार हमी समिती सोमवार दि.११ ऑक्टोबर पासून जिल्हा दौऱ्यावर येत आहे. या समितीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

सोमवार दि.११ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वा. जिल्ह्यातील खासदार, आमदार,  जिल्हा परिषद अध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती, पंचायत समिती सभापती  यांच्याशी रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत चर्चा. सकाळी १० ते ११ जिल्ह्यातील जनतेकडून  व स्वयंसेवी संस्थांकडून रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संदर्भाने प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने  जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांना भेटी देण्याबाबत  जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा- स्थळ- शासकीय विश्राम गृह अकोला. सकाळी ११ ते सायं. सहा पर्यंत रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांना भेटी व संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा.

मंगळवार दि.१२ ऑक्टोबर- सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच दरम्यान रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांना भेटी  व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा.

बुधवार दि.१३ ऑक्टोबर- सकाळी साडेनऊ वा. रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत योजना राबवितांना  येणाऱ्या अडचणी, तसेच या संदर्भात समितीने पाठवलेली प्रश्नावली  व समितीने कामांना दिलेल्या प्रत्यक्ष पाहणी भेटीत आढळलेल्या  त्रुटी इ. बाबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता (रोहयो), उपायुक्त(रोहयो), उपजिल्हाधिकारी (रोहयो) व ही योजना राबविणाऱ्या कार्यान्वयन यंत्रणेचे विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकारी यांच्याशी चर्चा करण्याबाबत बैठक- स्थळः जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला.

दुपारी दीड ते अडीच वा. पर्यंत राखीव. दुपारी अडीच वा. पासून चर्चा पुन्हा सुरु. चर्चेनंतर दौरा समाप्त.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ