‘मिशन वात्सल्य’ अकोला तालुका आढावा बैठक

 



अकोला, दि.२१(जिमाका)- तालुक्याची मिशन वात्सल्यसमितीची सभा तहसिलदार सुनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेला बालविकास प्रकल्प अधिकारी अमित रायबोले, बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी -१ डी.डी.इंगळे,  गटशिक्षणाधिकारी श्याम रा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जगदि बनसोडे, बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी-२सी.बी.चेके, तालुका विधी सेवा प्राधिकरण प्रतिनिधी पवन आगरकर,प्रफुल गावंडे आदी उपस्थित होते.

मागील २ वर्षात कोरोना मुळे काही बालकांनी आपले आई वडील गमावल्याने अनाथ झाले. काही एकल पालक झाले अशा सर्व घटकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारीत मिशन वात्सल्य समितीची स्थापना प्रत्येक तालुका स्तरावर करण्यासंबंधीचे शासन निर्णय निर्गमीत करण्यात आले त्यानुसार प्रत्येक तालुक्यात समिती स्थापन करून अंमलबजावणी करण्याचे निर्देश आहेत. या समितीचे अध्यक्ष तहसीलदार असुन सदस्य सचिव बाल विकास प्रकल्प अधिकारी हे आहेत. या सभेमध्ये समिती सचिव बालविकास प्रकल्प अधिकारी अमित रायबोले यांनी शासन निर्णयाचे वाचन केले. तर बैठक अध्यक्ष तहसिलदार पाटील यांनी समिती सदस्यांचे कर्तव्य आणि जवाबदाऱ्या सांगितल्या त्या नुसार विभागनिहाय काम करून अंमलबजावणी करण्यास सांगितले. तसेच अनाथ व एकल विधवा यांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा असे निर्देश दिले. जिल्हा महिला व बालविकास विभागाचे प्रतिनीधी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर यांनी कोवीड मुळे अकोला तालुक्यात विधवा झालेल्या महिलांची संख्या तथा एकल पालक झालेल्या बालकांबाबत बैठकीत माहीती दिली.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम