जिल्हाधिकारी यांचे आदेश; मार्गदर्शक सूचना जारी; ईद-ए-मिलाद साध्या पध्दतीने साजरा करा


अकोला,दि.18(जिमाका)- कोविड-19 चा प्रार्दुभाव लक्षात घेवून या वर्षीचा ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) जुलूस मंगळवार/बुधवार दि. 19 किंवा 20 रोजी (चंद्रदर्शनावर अवलंबून) साध्या पध्दतीने व शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार साजरा करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.  

मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे :

  1. कोविड -19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करुन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रकनुसार ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करावे.
  2. शासनाच्या आरोग्य विभागाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ईद--मिलाद शक्यतोवर घरात राहूनच साजरी करावी. तथापि मिरवणूका काढावयाच्या झाल्यास पोलीस प्रशासनाच्या पूर्व परवानगीने एका मिरवणूकीत जास्तीत जास्त पाच ट्रक आणि एका ट्रकवर जास्तीत जास्त पाच इसमांस परवानगी अनुज्ञेय राहील. मिरवणूकादरम्यान मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतराचे पालन करण्यात यावे.
  3. मिरवणूकीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीने ध्वनी प्रक्षेपणाची व्यवस्था केल्यास ध्वनी प्रदुषण नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.
  4. मिरवणुकीच्या दरम्यान मिरवणुकीच्या स्वागतासाठी पंडाल बांधावयाचे असल्यास शासनाच्या नियमानुसार संबंधीत महापालिका, पोलीस व स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. पंडालमध्ये एकावेळी किती उपस्थिती असावी याबाबत स्थानिक प्रशासनाने ठरविलेल्या विहीत नियमांचे पालन करावे.
  5. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियमांचे काटेकोर पालन करून मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर राखून धार्मिक प्रवचन करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
  6. प्रवचनाचे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करून शक्यतो ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात यावेत. केबल टि.व्ही. फेसबुक इत्यादी माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे इतरांना पाहण्याची व्यवस्था करावी.
  7. ई-ए-मिलाद निमित्त मिरवणूकीच्या रस्त्यावर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या स्मरणार्थ पाण्याचे तात्पुरते सबील लावण्यात येतात. सबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी उपस्थित राहू नये. या ठिकाणी सीलबंद पाण्याच्या बाटलींचे वाटप करण्यात यावे. सबील च्या ठिकाणी स्वच्छता राखावी व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे.
  8. प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये कोणतीही शिथीलता देण्यात येणार नाही.
  9. कोविड-19 परिस्थितीचा विचार करता रक्तदान शिबीरे, आरोग्य शिबीरे असे उपक्रम राबविण्यात यावेत. या उपक्रमांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी.
  10. या सूचनांव्यतिरिक्त स्थानिक परिस्थिती पाहून निर्बंध अधिक कडक करण्याचे अधिकार संबंधीत महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासनाला असतील.
  11. कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधीत महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ