जिल्‍हा काम वाटप समितीची बैठक पुढील दिनांकापर्यंत स्थगित

 


        अकोला, दि.13(जिमाका)- जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना कामांचे वाटप करण्याकरिता गुरुवार दि.14 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु  महाराष्ट्र विधानमंडळ रोजगार हमी समिती यांचा दौरा कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे काम वाटप समितीची बैठक पुढील तारखेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व पात्र सुशिक्षित बेरोजगार सहकारी सेवा संस्‍थाचे प्रस्‍ताव स्विकारणे सुरु आहे. आपण काम करण्‍यास इच्‍छूक असल्‍यास व काम वाटप समितीच्‍या पात्रतेनुसार (अटी व शर्थी) आपला प्रस्‍ताव प्राथमिक छाननी करीता जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय इमारत दुसरा माळा, अकोला या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा. ज्‍या सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्‍थानी या अगोदर प्रस्‍ताव सादर केलेला असेल त्‍यांचा प्रस्‍ताव पात्र असल्‍यास ग्राह्य धरण्‍यात येईल.

            जिल्ह्यातील सर्व पात्र सुशिक्षित बेरोजगार सहकारी सेवा संस्‍थानी आपले प्रस्‍ताव प्राथमिक छाननी करिता सादर करावे. तसेच काम वाटप समितीची बैठकीचा पुढील दिनांक निश्चित झाल्‍यानंतर आपणास कळविण्‍यात येईल, असे आवाहन सदस्‍य सचिव काम वाटप समिती तथा सहायक आयुक्‍त, जिल्‍हा कौशल्‍य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ