पावसाची शक्यता

 

अकोला दि. 16 : प्रादेशिक मौसम विभागनागपूर यांचे दि. 16 मे 2025 नुसार दि. 16 मे ते दि. 19 मे 2025 दरम्यान विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजाच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. यादरम्यान ताशी 30 ते 40 किमी प्रतितास याप्रमाणे हवेचा वेग राहण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटांसह विजा आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशावेळी आवश्यक ते कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नकाजनावरांना झाडांना किंवा विजेच्या तारेच्या खाली बांधू नका. विजवारा व पावसापासून बचावाकरिता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घेण्यात यावाअशास्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. पाऊस व विजाच्या स्थितीत मोबाईल फोनचा उपयोग टाळवा. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. सदर स्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घेण्याबाबत याव्दारे सुचित करण्यात येत आहे.

000000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा