शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टेक योजनेत ओळख क्रमांक मिळवावा विभागीय कार्यालयाचे आवाहन

 शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टेक योजनेत 

ओळख क्रमांक मिळवावा 

विभागीय कार्यालयाचे आवाहन 

 

अकोला दि. 7 : राज्य शासनाकडून ॲग्रीस्टेक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेत शेतकऱ्यांना ‘शेतकरी ओळख क्रमांक’ तयार करणे अनिवार्य आहे. ही प्रक्रिया शेतकरी बांधवांना योजनांचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त असून, त्यांनी तत्काळ ओळख क्रमांक मिळवावा, असे आवाहन अपर आयुक्त अजय लहाने यांनी केले आहे. 


ॲग्रीस्टेक योजनेचे ओळख क्रमांक हे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. शेतकरी ओळख क्रमांकाच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा लाभ, पीक कर्ज, किसान क्रेडिट कार्ड, कृषि पायाभूत सुविधा निधी, शेती विकासासाठी इतर कर्ज, पीक विमा, नैसर्गिक आपती नुकसान भरपाई, किमान आधारभूत किंमतीवर खरेदीमध्ये शेतक-यांचे नोंदणीकरण, कृषि कर्ज, दिर्घ मुदती कर्ज, खते, किटकनाशके, बि-बियाणे, कृषि अवजारे आदी योजनांचा लाभ सुलभरीत्या, पारदर्शकपणे व जलदगतीने शेतकऱ्यांना प्राप्त करता येईल.

अनेक शासकीय योजना, सेवा, सुविधा आदींचा लाभ घेण्यामध्ये ॲग्रीस्टेक योजनेत शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. अमरावती विभागातील सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक योजने अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करून घ्यावा तसेच शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करण्यासाठी कोणतीही अडचण असल्यास संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. लहाने यांनी केले आहे.

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा