निविष्ठा विक्रीत लिंकिंग आढळल्यास गुन्हे दाखल करणार; राज्यस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांचा इशारा शेतकऱ्यांची फसवणूक होता कामा नये – पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

 

निविष्ठा विक्रीत लिंकिंग आढळल्यास गुन्हे दाखल करणार; राज्यस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांचा इशारा

 

शेतकऱ्यांची फसवणूक होता कामा नये

 

पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

 

अकोला, दि. २२ : अकोला जिल्ह्यात बीबियाणे व खतांच्या कंपन्या कृषी केंद्रांना विक्री करत असताना लिंकिंग करून खाते व बीबियाण्याची विक्री असल्याचे कारवाईची मागणी राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ’अशा प्रकारे लिंकिंग होत असल्यास गुन्हे दाखल करण्यात येतीलअसा स्पष्ट इशारा राज्यस्तरीय खरीप बैठकीत दिला आहे.

 

पालकमंत्री ॲड. फुंडकर यांनी दिनांक 17 मे रोजी जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठकीत खरीप नियोजनाचा आढावा घेतला होता. झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने जिल्ह्यासाठी आवश्यक निविष्ठा व इतर बाबींबाबत मागणीचे निवेदन पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांना दिले. त्यानुसार निविष्ठांच्या सुरळीत पुरवठ्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी राज्यस्तरीय बैठकीत दिले आहेत.

 

खरीप हंगामात सोयाबीन व कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अजीत 155 ची किमान ३ लाख पाकिटे व अजित५ ची ५० हजार पाकिटे असा बियाण्याचा  पुरवठा करण्याची मागणी ही पालकमंत्र्यांनी निवेदनाद्वारे केली.

 

कपाशीचा पेरा वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन अकोला जिल्ह्यासाठी 25 हजार मे टन डीएपी खताचे आवंटन  मंजूर करून कृषी संचालक (निविष्ठा व गुण नियंत्रण) यांच्याकडून पुरवठा व्हावा, त्याचप्रमाणे

पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजनेत मृग बहार 2024 मधील अकोट तालुक्यातील उमरा मंडळात स्वयंचलित हवामान केंद्राच्या पर्जन्यमापकाशी दि. २ जुलै ते ५ जुलै २०२४ या चार दिवसाच्या कालावधीत छेडछाड झाली असल्याने दुसऱ्या नजीकच्या हवामान केंद्राचा डेटा घेऊन शेतकऱ्यांना मदत मिळण्याबाबतही पालकमंत्र्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

 

शेतकरी बांधवांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. जिल्ह्यात शेतकरी बांधवांची फसवणूक होता कामा नये. सर्व निविष्ठांचा सुरळीत पुरवठा व्हावा, असे निर्देश कृषी यंत्रणेला देण्यात आले आहेत.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा