व्यसनापासुन दुर राहा, निरोगी आयुश्य जगा - डॉ बळीराम गाढवे जिल्हा आरोग्य अधिकारी
अकोला दि. 30 : जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी 31 मे रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश तंबाखूच्या धोक्याबद्दल (dangers of tobacco) जनजागृती करणे हा आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, जागतिक तंबाखू विरोधी दिन 2025 ची थीम आहे "अपवादात्मक आकर्षण: तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांच्या उद्योगांच्या धोरणांचा पर्दाफाश.". जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांमुळे दरवर्षी सुमारे 8 लाख लोकांचा मृत्यू होतो. तंबाखूच्या सेवनामुळे हृदयाला त्रास होतो. रोग, पक्षाघात, कर्करोग आणि मधुमेह (Cancer and diabetes). शिवाय, यामुळे टाइप 2 मधुमेह होतो. मधुमेहाचा धोका देखील वाढतो.
जागतिक तंबाखू विरोधी दिनाचा इतिहास - तंबाखू सेवनामुळे होणारे आजार आणि मृत्यूच्या वाढत्या आकडेवारीमुळे जागतिक आरोग्य संघटनेने 1987 मध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिन सुरू केला. हा दिवस 7 एप्रिल 1988 रोजी पहिल्यांदा साजरा करण्यात आला. यानंतर, 31 मे 1988 रोजी WHO 42.19 ठराव पारित झाल्यानंतर, दरवर्षी 31 मे रोजी हा दिवस साजरा केला जाऊ लागला.
तंबाखूच्याज सेवनामुळे तोंडाचा, घशाचा, फुफ्फुसाचा, पोटाचा, किडनीचा, किंवा मूत्राशयाचा इत्यादि कँसर (कर्करोग) होऊ शकतात.तंबाखूमुळे ह्दय आणि रक्त वाहिन्यांसचे विकार, ह्दयरोग, छातीत दुखणे, हदयविकाराच्याक झटक्याूमुळे अचानक मरण येणे, स्ट्रोक (मेंदूचा विकार), परिधीय संवहनी रोग (पायाचा गैंग्रीन) हे रोग होतात.तंबाखू हे क्षयरोग होण्यापचे अप्रत्यक्ष कारण आहे. सिगरेट किंवा बीड़ीचे धूम्रपान, जितके अधिक, तितके अधिक टीबीचे प्रचलन वाढू शकते.धूम्रपान/ तंबाखूचे सेवन अचानक रक्तदाब वाढविते आणि हदयाकडे जाणारा रक्तपुरवठा कमी करते.ह्यामुळे पायाकडे होणा-या रक्तप्रवाहात देखील कमतरता येते आणि पायात गैंग्रीन होऊ शकते.तंबाखू किंवा धूम्रपानामुळे मधुमेह होण्याकची शक्यता जास्त बळावते.तंबाखू मुळे रक्तातील चांगले कोलॅस्ट्राँलचे प्रमाण कमी होते.धूम्रपान / तंबाखूचे स्त्री व पुरुषांवर दुष्परिणाम होतात.याचे सेवन पुरुषांमध्ये नपुंसकतेचे कारण आहे.धूम्रपान / तंबाखूचे सेवन स्त्रियांमध्ये इस्ट्रोजनची पातळी कमी करते व रजोनिवृत्ति लवकर होते.धूम्रपान / तंबाखूचे सेवन शारीरिक ताकद कमी करते आणि त्यामुळे सहनशीलता ढासळते.ज्या स्त्रिया धूम्रपान करतात आणि गर्भनिरोधके घेतात त्यांच्यात स्ट्रोकचा धोका वाढतो.ज्या गरोदर स्त्रिया, धूम्रपान करतात, त्यांच्यात गर्भपाताची शक्य ता वाढते, किंवा मूल कमी वजनाचे होते, किंवा बाळाच्या विकासात्मक समस्या वाढतात, किंवा बाळाचा अचानक मृत्यु देखील ओढवू शकतो. सिगारेट कोणकोणत्या अवयवांना नुकसान पोहोचवते. हृदय (Heart)-सिगारेट ओढणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका 2 ते 4 पटीने जास्त असतो.सिगारेटमधील निकोटीन आणि टार रक्तवाहिन्यांना (Blood Vessels) अरुंद करतात, ज्यामुळे रक्ताभिसरण (Blood Circulation) बाधित होतं आणि हृदयविकारांचा धोका वाढतो.धुरामध्ये असलेला कार्बन मोनॉक्साईड रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी करतो, ज्यामुळे हृदयावर जास्त ताण येतो.ब्लड प्रेशर नेहमी उच्च राहतं(high), ज्यामुळे हळूहळू हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
मेंदू (Brain) - सिगारेट ओढण्यामुळे स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकते आणि डिमेंशियाचा (स्मृतिभ्रंश) धोका वाढतो.धुरामध्ये असलेली रसायने मेंदूच्या पेशींना (Brain Cells) इजा पोहोचवतात, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.हे मज्जासंस्थेला (Nervous System) कमकुवत करतं, ज्यामुळे एकाग्रता (Concentration) आणि विचार करण्याची क्षमता कमी होते.
त्वचा (Skin) - सिगारेटचा धूर तुमच्या त्वचेतील आर्द्रता आणि आवश्यक पोषक तत्वं काढून घेतो, ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या, वांग आणि निस्तेज त्वचा दिसू लागते.कोलेजन (Collagen) चं उत्पादन कमी होतं, ज्यामुळे त्वचा सैल पडू लागते आणि तुम्ही वेळेआधीच म्हातारे दिसू लागता.सिगारेट ओढणाऱ्यांची त्वचा लवकर निस्तेज आणि काळवंडते, कारण धूम्रपान केल्यामुळे त्वचेला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो.
किडनी (Kidneys) - सिगारेट ओढल्याने किडनी कॅन्सर होण्याचा धोका 50% पर्यंत वाढतो.धुरामध्ये असलेले विषारी पदार्थ (Toxins) किडनीच्या ऊतींना (Tissues) इजा पोहोचवतात, ज्यामुळे किडनी हळूहळू खराब होऊ लागते.हे ब्लड प्रेशर वाढवतं, जे किडनी फेल्युअरचं सर्वात मोठं कारण बनू शकतं.
डोळे (Eyes) - सिगारेटचा धूर डोळ्यांच्या नाजूक रक्तवाहिन्यांना (Blood Vessels) नुकसान पोहोचवतो, ज्यामुळे रक्तप्रवाह मंदावतो आणि दृष्टी कमकुवत होऊ लागते.दीर्घकाळ धूम्रपान केल्याने मोतीबिंदू (Cataract) आणि अंधुक दृष्टी (Blurred Vision) ची समस्या लवकर येऊ शकते.सिगारेट ओढणाऱ्यांमध्ये वयाशी संबंधित मॅक्युलर डिजेनेरेशन (AMD) चा धोका 3 पटीने जास्त असतो, ज्यामुळे वय वाढल्यानंतर डोळ्यांची दृष्टी पूर्णपणे जाऊ शकते.
धूम्रपान/तंबाखू सोडण्यासाठी युक्त्या - जेव्हा तल्लफ येईल तेव्हा, तुमच्या मुलांबद्दल आणि त्यांच्या भवितव्याबद्दल विचार करा व तुमच्यावर तंबाखूमुळे होणा-या भयंकर रोगांचा विचार करा..जेव्हा तुम्हाला धूम्रपान/तंबाखूची तल्लफ लागेल तेव्हा ४ गोष्टी लक्षात ठेवा १. काहीतरी वेगळे करायचा प्रयत्न करा २. दोन सिगरेट पिण्यामध्ये विलम्ब करा ३. दीर्घ श्वास घ्या. ४. पाणी प्या.स्वनतःसाठी सकारात्मक बोला.दररोज आरामाच्या तंत्रांचा वापर करा जसे (व्यायाम,योग, चालणे, ध्यानधारणा, नृत्य, संगीत इत्यादी). पोषक आहार घ्या व्यसनापासुन दुर राहा निरोगी आयुश्य जगा असे आवाहन डॉ बळीराम गाढवे जिल्हा आरोग्य अधिकारी अकोला यांनी केले आहे.
000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा