अकोला तालुक्यासाठी ६ मे रोजी सरपंच आरक्षण सोडत

 

 

 

अकोला तालुक्यासाठी ६ मे रोजी सरपंच आरक्षण सोडत

अकोला, दि. २ : अकोला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींसाठी सन २०२५ ते २०३० या कालावधीत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सरपंच पदासाठी जातीनिहाय आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत मंगळवार, ६ मे रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय अकोला येथील डि.बी.ए. हॉलमध्ये होणार आहे. या सोडतीत अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार असून, महिला सरपंच पदासाठी स्वतंत्र सोडतही यावेळी घेतली जाणार आहे.तहसीलदार कार्यालयातर्फे सर्व संबंधित नागरिक, लोकप्रतिनिधी आणि इच्छुकांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी केले आहे.

---

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन