विद्यार्थ्यांचा कल तपासण्यासाठी विनामूल्य मार्गदर्शन ‘डाएट’चा उपक्रम

  

 

 

 

विद्यार्थ्यांचा कल तपासण्यासाठी विनामूल्य मार्गदर्शन

‘डाएट’चा उपक्रम

अकोला, दि. २९:  विद्यार्थ्यांची क्षमता व कल तपासून त्यांना करिअरविषयक मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे विनामूल्य मार्गदर्शन सेवा देण्यात येत आहे.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे कार्यालय शहरातील हनुमान वसाहतीत संतोषी मातेच्या देवळाजवळ आहे. तिथे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता, अभिरूची, व्यक्तिमत्व व करिअर निवडीसाठी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी विनामूल्य सेवा उपलब्ध आहे. विद्यार्थी व पालकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या प्राचार्य रत्नमाला खडके यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन विभागप्रमुख नितीन भालचक्र यांच्याशी किंवा ९४२३४०७४८८ यांच्याशी संपर्क साधावा.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*