शासकीय बालगृहातील १० वी व १२ वी उत्तीर्ण बालकांचा कौतुकसोहळा
अभ्यास व वेळेच्या नियोजनाने यश साध्य
-
योगेश पैठणकर
अकोला, दि. २१ : अभ्यास व वेळेच्या नियोजनाने
यश साध्य होते, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी येथे सांगितले.
शासकीय बालगृहातील १० वी व १२ वी उत्तीर्ण
बालकांचा कौतुकसोहळा नुकताच झाला, त्यावेळी ते बोलत होते. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे
माजी सदस्य अॅड. संजय सेंगर व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर उपस्थित
होते.
गायत्री बालिकाश्रम येथील १३ बालिका,
सुर्योदय बालगृहातील ९ बालके, शासकीय बालगृहातील ४ बालके यांचा सत्कार भेटवस्तू देऊन
यावेळी करण्यात आला. बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष अॅड. अनिता गुरव, बालकल्याण समिती
सदस्य राजेश देशमुख, डॉ. विनय दांदळे, अॅड.शीला
तोष्णीवाल, प्रांजली जैस्वाल, अॅड. सारीका घिरणीकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू
लाडुलकर यांनी बालकांना शुभेच्छा दिल्या. संजय मोटे यांनी सूत्रसंचालन केले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा