ड्रोन वापरास बंदी

 

 

ड्रोन वापरास बंदी

अकोला, दि. 21 : जिल्ह्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ नुसार ड्रोन, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर आदी साधने वापरण्यास  बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी हा आदेश जारी केला असून, तो दि. ३ जूनपर्यंत लागू राहील.

 

पहलगाम येथील पर्यटकांवरील हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने दहशतवादी संघटनांचे तळ उध्वस्त केले. भारताकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविण्यात आले. आता त्याला स्थगिती देण्यात आली आहे. तथापि, दहशतवाद्यांचे स्लीपर सेल्स सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार ड्रोन, रिमोट नियंत्रित मायक्रो लाईट, एअरक्राफ्ट, पॅरामोटर, हँगग्लायडर, हॉट एअर बलून अशी साधने बाळगताना किंवा वापरताना आढळल्यास संबंधितांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. हा आदेश अकोला जिल्ह्याच्या हद्दीत दि. ३ जूनपर्यंत लागू राहील.  

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा