शेती साधनांसाठी अनुदान, अर्ज करण्याचे आवाहन

 

शेती साधनांसाठी अनुदान,

अर्ज करण्याचे आवाहन

अकोला, दि. ७ : जि. प. कृषी विभागामार्फत उपकर योजनेतून (सेस फंड) राबविण्यात येणा-या कृषी योजनांसाठी इच्छूकांनी दि. २१ मेपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेत सर्वसाधारण शेतक-यांना ९० टक्के अनुदानावर एचडीपीई पाईप, तसेच पीव्हीसी पाईप पुरविण्यात येणार आहेत. सर्वसाधारण शेतक-यांना ९० टक्के अनुदानावर इलेक्ट्रिक पंप (ओपनवेल सबमर्सिबल पंपसेट ५ एचपी पाणबुडी), सौर किंवा वीजेवरील चार्जिंग झटका मशिन शेतीच्या तार कुंपणासाठी पुरविणे, मनुष्यचलित पेरणी यंत्रे पुरविणे, मनुष्यचलित बीज प्रक्रियायंत्र पुरवणे, ब्रश कटर यंत्र पुरविणे, पॉवर विडर कम इंटर कल्टिवेटर यंत्र पुरविणे अशा योजना कार्यान्वित आहेत.

 

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासह १ एप्रिल २०२५ नंतरचा सातबारा, आधारपत्र, दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र आदी कागदपत्रे पंचायत समितीकडे दि. २१ मेपूर्वी जमा करावीत. अधिक माहितीसाठी पंचायत समितीतील कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिका-यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा