पावसाळी वातावरण खबरदारी



3 महिन्याचा शिधा एकाचवेळी देणार
अकोला, दि. २७ : शासनाकडून आगामी पावसाळा व प्रतिकुल हवामान परिस्थीतीमुळे माहे जून, जुलै व ऑगस्ट 2025 पर्यतच्या अन्नधान्याची आगाऊ उचल व वाटप करण्यात येणार  आहे.

 सदर अन्नधान्याची पुरवठा विभागाकडून आगाऊ उचल दिनांक 31 मे 2025 पर्यंत व वाटप दिनांक 30 जून रोजीपर्यत पुर्ण होणार आहे. तसेच प्रत्येक महिन्याचे व्यवहार (ट्रांन्झेक्शन) व प्रमाणीकरण स्वतंत्रपणे करण्याचे निर्देश दिलेले आहे. माहे जून, जुलै व ऑगस्ट 2025 पर्यतच्या अन्नधान्याचे वाटप दिनांक 01 जून 2025 पासून होणार आहे.

जिल्हा प्रशासनाचे वतीने सर्व पात्र लाभार्थीना आवाहन करण्यात येते की, या जिल्हयातील पावसाचे वातावरण / नैसर्गिक आपत्ती / पुरस्थिती लक्षात घेता त्यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत येणा-या पात्र शिधापत्रिकाधारकांनी माहे जून, जुलै व ऑगस्ट 2025 चे दिनांक 30 जून 2025 पुर्वी धान्य E-POS मशिन वर थम देऊन एकाच वेळी रास्तभाव दुकानातून उचल करावी. जेणेकरून कोणताही पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही.

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*