मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरु
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी
शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरु
अकोला, दि. २३ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या विद्यार्थी,
तसेच विद्यार्थिनींच्या शासकीय वसतिगृहांत विनामूल्य प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात
आली आहे.
अकोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, तसेच
बार्शिटाकळी येथील मुलांचे वसतिगृह आणि अकोला येथील १२५ वी जयंती मागासवर्गीय मुलींचे
शासकीय वसतिगृह येथे प्रवेश देणे सुरू आहे. या वसतिगृहांत आठवी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना
निवास, न्याहारी व भोजन, स्टेशनरी भत्ता, गणवेश
भत्ता, मासिक निर्वाह भत्ता, अभ्यासिका आदी सुविधा विनामूल्य मिळतात.
बार्शिटाकळी व अकोला येथील मुलांच्या वसतिगृहात प्रवेशासाठी शालेय विद्यार्थ्यांनी
दि. १५ जुलैपूर्वी, इयत्ता १० व ११वी नंतरच्या अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थ्यांनी
दि. ३० जुलैपर्यंत आणि १२ वी नंतरच्या पदवीच्या विद्यार्थ्यांनी दि. २४ ऑगस्टपर्यंत
ऑनलाईन अर्ज करावा व वसतिगृहात सादर करावा, असे आवाहन गृहपाल के. एम. तिडके (संपर्क
८३०८०५८८३३) यांनी केले.
त्याचप्रमाणे, आदर्श कॉलनीतील १२५ वी जयंती मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह
येथे इयत्ता ८ ते वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया
सुरू झाली असल्याची माहिती गृहपाल श्रीमती कुलकर्णी यांनी दिली. सामाजिक न्याय व विशेष
सहाय्य विभागाच्या hmas.mahait.org या संकेतस्थळावरून आपले अर्ज भरून त्याची प्रत कार्यालयात
जमा करावी. अनु. जाती, जमाती वि.जा.भ.ज., विशेष मागास प्रवर्ग, अनाथ अपंग आर्थिक मागास
प्रवर्ग यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन श्रीमती कुलकर्णी यांनी केले. या वसतिगृहाचा
संपर्क क्रमांक ९७६६३०९८४३ असा आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा