अवैध सावकारी धाडसत्र : जप्त तारण मालमत्तेबाबत संबंधितांना दावे करण्याचे आवाहन
अवैध सावकारी धाडसत्र : जप्त तारण मालमत्तेबाबत संबंधितांना दावे करण्याचे आवाहन
अकोला, दि. १५ : जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने अवैध सावकारी प्रकरणात जप्त केलेल्या तारण मालमत्तेबाबत संबंधित कर्जदार अथवा त्यांच्या संबंधितांकडून लेखी दावे मागविले असून, दावेसाठी अंतिम मुदत ३० मे देण्यात आली आहे. यानंतर प्राप्त होणाऱ्या दाव्यांचा विचार केला जाणार नसल्याचे उपनिबंधक प्रवीण लोखंडे यांनी कळविले आहे.
अकोला जिल्ह्यात ६ फेब्रुवारी आणि २६ मार्च रोजी धाडसत्रादरम्यान अवैध आणि विनापरवाना सावकारी करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. यामध्ये ज्या कर्जदारांनी ताबेगहाण ठेवली होती. त्या संबंधितांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कागदपत्रे पाहून १९ ते ३० मे या कालावधीत आवश्यक पुराव्यांसह लेखी स्वरूपात दावे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ‘सहकार संकुल’ आदर्श कॉलनी येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे. अन्यथा मालमत्ता अधिनियमातील कलम १७(४) नुसार शासनाकडे जमा करण्यात येईल. संबंधित सर्वांनी वेळेत दावे सादर करून आवश्यक ती कारवाई करावी, असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे.
सत्र दरम्यान जप्त करण्यात आलेली मालमत्ता
या कारवाईत सौ.वर्षा गजानन पिसे व गजानन पिसे (रा. गणेश विहार अपार्टमेंट तुकाराम चौक गुरुकुल कमानी जवळ अकोला ता. अकोला जि. अकोला), तसेच डॉ. नवल द्वारकादास मानधने व पवन द्वारकादास मानधने (रा. मानधने हॉस्पिटल स्केटिंग ग्राउंड गोरक्षण रोड संस्थांसमोर, गौरक्षण रोड, अकोला ता. अकोला जि.अकोला)
आणि
सय्यद मंजूर सय्यद मोबीन (रा. डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळ इंदिरानगर अकोट फाईल, ता.अकोला जि. अकोला) अकिल खान हाजी खान ( रा. मालिक चौक इंदिरानगर अकोट फाईल, ता.अकोला जि.अकोला) आदी ठिकाणी तारण असलेली मालमत्ता जप्त करण्यात आली.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा