जिल्ह्यातील ५३ गावांत कुपनलिका व विंधनविहिरी

 

 

 

जिल्ह्यातील ५३ गावांत कुपनलिका व विंधनविहिरी

अकोला, दि. २९  : जिल्ह्यातील ५३ गावांत एकूण २० कुपनलिका व ३४ विंधनविहीरी  कामे दि. २० जूनपूर्वी पूर्ण करून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रस्तावित उपाययोजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी याबाबतचा आदेश निर्गमित केला.

अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई, सोमठाणा बु.,, केळपाणी बु., तेल्हारा तालुक्यातील दहिगाव, चांगलवाडी, बाभुळगाव, टाकळी, अटकळी, राणेगाव, मनब्दा, खाकटा, नेर, अडसूळ, कार्ला बु., सोनवाडी, वरूड वडनेर, सौंदळा, धार, तुदगाव, खापरखेड येथे कुपनलिकांची कामे पूर्ण करण्यात येतील.

त्याचप्रमाणे, पातूर तालुक्यातील नांदखेड, अंधारसांगवी, गोंधळवाडी, पिंपरडोळी, झरंडी, धोदानी, हिंगणी, आसोला, आलेगाव, चरणगाव, सुकळी, शिरपूर, मलकापूर व मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरा, ताकवाडा, शेलू बाजार, रोहणा, गुंजवाडा, औरंगपूर बपोरी, मंडुरा, लंघापूर, बोर्टा, ब्रम्ही, शिरताळा, कासारखेड, जांभा खुर्द (एक व दोन), सांजापूर, समशेरपूर, टिपताळा, लोणसना, कवठा सोपीनाथ आणि अकोट तालुक्यातील खिरकुंड बु., तसेच अकोला तालुक्यातील बाखराबाद येथे प्रत्येकी एक विंधनविहीरीचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा