प्रकल्पबाधितांसाठी निर्गमित प्रमाणपत्रांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द
Ø आक्षेप असल्यास कळविण्याचे आवाहन
अकोला दि. 16 : पुनर्वसन शाखेकडून दि. 10 मार्च ते 10 मे या कालावधीत प्रकल्पबाधित व्यक्तींसाठी निर्गमित केलेल्या विविध प्रमाणपत्रांचा तपशील असलेली यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. आक्षेप असल्यास 26 मे पूर्वी कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची प्रकल्प बाधित व्यक्तीसाठी विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिल्याने पदभरतीच्या प्रसिध्द जाहिरातीच्या अनुषंगाने प्राप्त अर्जानुसार दि. 10 मार्च ते 10 मे या कालावधीत निर्गमित केलेल्या विविध प्रमाणपत्रांचा तपशील असलेली यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर (www.akola.nic.in) सुचना फलक या सदराखाली प्रसिध्द करण्यात आली आहे. या यादीतील नावांबाबत कोणाला आक्षेप असल्यास त्याबाबत आवश्यक पुरावे कागदपत्रांसह पुनर्वसन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयीन ईमेल akola.dro@gmail.com या पत्यावर दि. 26 मे पर्यंत नोंदवावे, असे आवाहन पुनर्वसन उपजिल्हाधिकारी महेश परंडेकर यांनी केले आहे.
000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा