पोलीस मालखान्यातील जप्त वस्तूंच्या लिलावाची प्रक्रिया सुरू
पोलीस मालखान्यातील जप्त वस्तूंच्या लिलावाची प्रक्रिया
सुरू
अकोला, दि. २९: जिल्हा पोलीसांनी १९९२ ते २००५ दरम्यान विविध प्रकरणी
जप्त केलेल्या मुद्देमालाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.याबाबतचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी
डॉ. शरद जावळे यांनी जारी केला आहे.
या मुद्देमालाच्या मूळ मालकांचा सर्वतोपरी तपास करूनही शोध लागला नाही.
त्यामुळे मुद्देमाल लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या मालखान्यात दीर्घकाळापासून पडून आहे.
त्यामुळे लवकरच लिलावाद्वारे विल्हेवाटीची रीतसर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
या कार्यवाहीसाठी अकोला तहसीलदारांना सक्षम अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे.
या मुद्देमालात विविध धातूंचे दागिने, सुटकेस, बॅग्स, पुरुष व महिलांचे कपडे, घड्याळे,
कॅमेरे, मोबाईल फोन आदी वस्तूंचा समावेश आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा