अकोट येथील मागासवर्गीय विद्यार्थिनी वसतिगृहात प्रवेश सुरु

 

अकोट येथील मागासवर्गीय विद्यार्थिनी वसतिगृहात प्रवेश सुरु

 

अकोला, दि.२९ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अकोट येथे पोपटखेड रस्त्यावर सत्यभामा संकुल येथे मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह सुरू आहे. तेथील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

इयत्ता ८ वी ते वरिष्ठ महावि‌द्यालयापर्यंतच्या विद्यार्थिनींना वसतिगृहाच्या रिक्त जागेनुसार प्रवेश मिळू शकेल. त्यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया चालू झाली असून, hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज भरून त्याची प्रत कार्यालयात जमा करावी. अनु. जाती, जमाती वि.जा.भ. ज. विशेष मागास प्रवर्ग, अनाथ अपंग आर्थिक मागास प्रवर्ग यांनी वसतिगृहात अर्ज सादर करावा, असे आवाहन गृहपाल श्रीमती कुलकर्णी यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा