जवाहर नवोदय सुयश

 

जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

अकोला, दि. १९ :  पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दहावी व बारावीच्या परीक्षेत संपूर्ण उत्तीर्ण (१०० टक्के) निकालाची परंपरा कायम ठेवत भरघोस गुणही प्राप्त केले आहेत.

दहावीच्या परीक्षेत आयुष्य रेखाते (९८ टक्के), आनंद पाटील (९७.२० टक्के), सार्थक काकड (९७ टक्के), बारावी विज्ञानमध्ये शुभम वडतकर (९३ टक्के), गौरी राऊत (९०.४० टक्के), अनुराग गणोरकर (८९ टक्के), बारावी वाणिज्यमध्ये रजनी चालाख (९४.२० टक्के), दिशा शेवाळे (९२.४० टक्के), प्रतीक्षा तांगडे (९१.४० टक्के) हे गुणवंत ठरले आहेत. प्राचार्य आर. एस. चंदनशिव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

०००

    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा