कौशल्य विकास विभागातर्फे गुरूवारी रोजगार मेळावा

 

 

कौशल्य विकास विभागातर्फे

गुरूवारी रोजगार मेळावा

अकोला, दि. २३ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे रोजगार मेळावा दि. २९ मे रोजी सकाळी १० वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आयोजिण्यात आला आहे. विविध कंपन्यांत सुमारे सव्वाशे पदे या मेळाव्याद्वारे भरली जातील.

पुण्यातील एडीएम जॉईनफ्लेक्स कंपनीत ७० विविध पदे भरली जातील. दहावी, बारावी, आयटीआय, अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी आदी अर्हताधारकांनी अर्ज करावा. अकोल्यातील छाया रूग्णालयात ११ पदे भरली जाणार असून, बारावी, पदवीधर, एएनएम, जीएनएम, बीएचएमएस आदी अर्हताधारकांना अर्ज करता येईल.

अस्पा ग्लोबल कंपनीत किमान १२ वी, तसेच पदवीधरांना नोकरीची संधी आहे. तिथे विविध २० पदे भरण्यात येणार आहेत. ग्रामीण कुटा कंपनीत बारावी उत्तीर्ण किंवा पदवीधरांतून विविध २५ पदे भरली जाणार आहेत.

इच्छुकांनी कागदपत्रे व छायाचित्रांसह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी (०७२४) २४३३८४९ या दूरध्वनी किंवा ७०२४२४१०९८ किंवा ८९८३४१९७९९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा