भटक्या प्राण्यांसाठी सेवाभावी तत्वावर निवारागृह इच्छूक संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन

 

भटक्या प्राण्यांसाठी सेवाभावी तत्वावर निवारागृह

इच्छूक संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन

          अकोला, दि. ५ : जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीतर्फे कापशी येथे भटक्या प्राण्यांकरिता सेवाभावी तत्वावर निवारागृह चालविण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्जाचा नमुना व नियमावली महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर  (https://dahd.maharashtra.gov.in) प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छूकांनी विहित नमुन्यात अर्ज दि. ३१ मे पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय येथे जमा करावेत किंवा टपालाने जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, पंचायत समितीच्या बाजूला, अकोला  या पत्यावर पाठवावेत, असे आवाहन ज‍िल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतारे यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा