पालकमंत्र्यांकडून स्व. महानकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

 






अकोला, दि. ३० : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व आणीबाणी स्वातंत्र्यसैनिक बंडू उर्फ रमेश रामभाऊ महानकर (८१ वर्षे) यांचे आज निधन झाले. राज्याचे कामगार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज अकोट येथे स्व. महानकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

पालकमंत्र्यांनी स्व. महानकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
०००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा