कृषी निविष्ठांबाबतच्या तक्रारी व्हाटस ॲपद्वारे कळवाव्यात कृषी विभागातर्फे ऑनलाईन तक्रार निवारण

 

सात पाच आठ आठ चार एक चार सहा नऊ नऊ

कृषी निविष्ठांबाबतच्या तक्रारी व्हाटस ॲपद्वारे कळवाव्यात

कृषी विभागातर्फे ऑनलाईन तक्रार निवारण

अकोला, दि. २९ : शेतक-यांना खते व बियाणे वेळेवर न मिळणे, लिंकिंग किंवा चढ्या दराने निविष्ठांची विक्री अशा तक्रारी ७५८८४१४६९९ या व्हाटस ॲप क्रमांकावर दाखल कराव्यात जेणेकरून तत्काळ निवारण करता येईल, असे आवाहन जिल्हा प्रशासन व जि. प. कृषी विकास अधिका-यांनी केले आहे.  

काही गावांमध्ये विशेषत:  दुर्गम गावांत खते व बियाणे मिळत नसल्याने दुकानांमध्ये इतर वस्तू खरेदी करण्यासाठी लिंकिंग, तसेच चढ्या दराने विक्री होत असल्याबाबत तक्रारी येत आहेत. त्यांचे निराकरण तत्काळ व्हावे यासाठी व्हाटस ॲप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

या क्रमांकावर तक्रार दाखल करताना शेतकऱ्यांनी त्यांचे नाव, गाव, तालुका, संबंधित दुकानाचे नाव, ठिकाण, तक्रार, संपर्क क्रमांक व फोटो (असल्यास) अशा प्रकारे तक्रार नोंदवावी. प्राप्त तक्रारी कृषी विभाग, तसेच पोलीस विभाग यांच्या समन्वयाने तपासल्या जाणार आहेत. गैरव्यवहार करणा-या विक्रेत्यांविरुद्ध प्रशासकीय, कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

शेतकरी बांधवांनी कोणत्याही प्रकारचा अन्याय, बळजबरी असे काही होत असेल न घाबरता तक्रार नोंदवावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन  जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन