एसईबीसी व ओबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता सादर करण्यासाठी मुदत तत्काळ त्रुटी दूर करून प्रमाणपत्र मिळवा; पडताळणी समितीचे आवाहन
एसईबीसी व ओबीसी विद्यार्थ्यांना
जात वैधता सादर करण्यासाठी मुदत
तत्काळ त्रुटी दूर करून प्रमाणपत्र मिळवा; पडताळणी समितीचे
आवाहन
अकोला, दि. 14 : विविध व्यावसायिक
अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश निश्चित झालेल्या मात्र, जात वैधता प्रमाणपत्र
सादर न शकलेल्या एसईबीसी व ओबीसी विद्यार्थ्यांना दि. 2 मे रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार
प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ३ महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.
संबंधित विद्यार्थ्यांनी प्रलंबित अर्जांतील त्रुटींची पूर्तता करून
तत्काळ प्रमाणपत्र मिळविण्याचे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले आहे.
हा जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिने मुदतवाढीचा निर्णय
एसईबीसी व ओबीसी प्रवर्गातील ज्या उमेदवारासाठी प्रवेश निश्चित झालेले आहेत व मुदतीत
जात वैधता प्रमाणपत्र विहीत मुदतीत सादर करु शकले नाहीत अशाच उमेदवारांसाठी आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी (अभियांत्रिकी,
वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्याक्रमांसहित) एसईबीसी व ओबीसी प्रवर्गातील उमेदवार
प्रवेशापासून वंचित राहू नयेत यासाठी हा निर्णय झाला. ज्या उमेदवाराचे त्रुटी पूर्ततेअभावी
प्रस्ताव प्रलंबित असतील अशा उमेदवारांनी समितीच्या कार्यालयात स्वतः उपस्थित राहुन
त्रुटींची पूर्तता करावी जेणेकरून विहित जात
वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन प्रणालीव्दारे वितरित करणे सोयीचे होईल, असे आवाहन समितीचे
अध्यक्ष जितेंद्र काकुस्ते, उपायुक्त अमोल यावलीकर व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव
मनोज मेरत यांनी केले आहे.
0000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा