प्रमाणित बियाणे वितरण अर्ज करण्याचे आवाहन

 

अकोला दि. 26 : शेतकऱ्यांना दर्जेदार प्रमाणित बियाणे अनुदानीत दरावर उपलब्ध व्हावे व कडधान्य व गळीत धान्य पिकांच्या नविन वाणाचा प्रचार प्रसार व्हावा व शेतकऱ्यांना अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान कडधान्य व कापूस योजना प्रमाणित बियाणे वितरण राबविण्यात येत आहे.

 त्याअंतर्गत पिक प्रात्यक्षिक तूर, मुग, उडीद व कापूस (१०० % अनुदावर ०.४० हे. / शेतकरी गर्यादेत) फक्त शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपनी / कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था इ. करिता (शेतकरी गट हा ३१ मार्च २०२४ पूर्वी नोंदणी केलेला असावा.) प्रमाणित बियाणे वितरण तूर, मुंग, उडीद (१० वर्षा आतील बियाणे रु.५००० प्रति क्वि. क्षेत्र २.०० हे. / शेतकरी मर्यादेत व १० वर्षा वरील बियाणे रु. २५०० प्रति क्वि. क्षेत्र २.०० हे. / शेतकरी मर्यादेत) खाद्य तेल व तेलताड अभियान (गळीतधान्य) अंतर्गत पिक प्रात्यक्षिक सोयाबीन (१०० टक्के अनुदावर ०.४० हे. / शेतकरी मर्यादेत) फक्त शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था इ. करिता (शेतकरी गट हा ३१ मार्च २०२४ पूर्वी नोंदणी केलेला असावा) प्रमाणित बियाणे वितरण सोयाबीन (५ वर्षा आतील बियाणे १००% अनुदावर १.०० हे. / शेतकरी मर्यादेत) सोयाबीन, तुर, मुंग व उडीद या पिकाच्या अनुदान तत्वावर बियाणे लाभ मिळणे करिता महाडीबीटी पोर्टलंवर (https://mahadbtmahait.gov.in) या वेबसाईटवर जाऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावे, असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अकोला यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता कृषि विभागाच्या कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा