दहशतवाद हिंसाचारविरोधी दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ कार्यक्रम
अकोला, दि.२१: भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी २१ मे रोजी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’साजरा केला जातो. यानिमित आज जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ कार्यक्रम झाला.
दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा यावेळी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील व जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा