मूर्तिजापूर तालुक्यातील ८ सहकारी संस्थांच्या निवडणुका

 

अकोला, दि. १७ : मूर्तिजापूर तालुक्यातील ८ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार असून, त्याविषयीचा कार्यक्रम जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी जाहीर केला आहे.
घुंगशी, हातगाव, सिरसो, सोनोरी, सोनाळा परसोडा, सांगवी, राजुरा प्र. माना व कार्ली येथील सेवा सहकारी संस्थांची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. मे महिन्यात नामनिर्देशन पत्र दाखल करणे, मागे घेणे आदी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून, जून महिन्यात मतदान घेण्याचे नियोजन आहे.
निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम संबंधित सहकारी संस्था, मूर्तिजापूर येथील सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालय, तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालयात नोटीसबोर्डवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन