जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा शुभारंभ गरीब व गरजू रूग्णांना तत्काळ मदत मिळण्यासाठी उपयुक्त – पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

 







अकोला, दि. १ :  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीत मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून, त्याचा शुभारंभ राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड आकाश  फुंडकर यांच्या हस्ते आज येथे झाला. 

आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी अजित कुंभार,  पोलीस अधीक्षक बच्चन सिंह,  महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे आदी उपस्थित होते. गरजूंना अत्यावश्यक आरोग्य सेवा व आर्थिक सहाय्य देण्याकरिता प्रथम मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत करण्यात आला. ही सेवा नागरिकांना त्यांच्याच जिल्ह्यात सहजपणे उपलब्ध व्हावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रकरणांची माहिती आपल्याच जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे, स्थानिक गरीब व गरजू बांधवांना या कक्षाचा लाभ होईल, असा विश्वास पालकमंत्री ॲड. फुंडकर यांनी यावेळी व्यक्त केला. 

महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत मिळविण्याची प्रक्रिया पूर्णतः पेपरलेस करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही. याकरिता लवकरच स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती कक्षातर्फे देण्यात आली.

००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा