‘जीडीसी अँड ए’ परीक्षा शुक्रवारपासून
‘जीडीसी अँड ए’ परीक्षा शुक्रवारपासून
अकोला, दि. २२ : सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत ‘गव्हर्मेंट
डिप्लोमा इन को-ऑपरेशन अँड अकाऊंटसी’ (जीडीसी अँड ए) व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन
प्रमाणपत्र (सीएचएम) दि. २३, २४ व २५ मे रोजी होणार आहे.
जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयामार्फत ही प्रक्रिया राबविण्यात
येत असून, परीक्षेची वेळ सकाळी १० ते १ आणि दु. २ ते ५ अशी आहे. अकोला, बुलडाणा व वाशिम
जिल्ह्यातील १९५ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. खंडेलवाल ज्ञानमंदिर शाळा, श्री इंदिरादेवी
मोहनलाल खंडेलवाल मेमोरिअल हायस्कूल, विजय सोसायटी, गोरक्षण रस्ता, अकोला असा परीक्षा
केंद्राचा पत्ता आहे.
ही परीक्षा उत्तीर्ण होणा-या परीक्षार्थींना नागरी सहकारी बँका, नागरी सहकारी पतसंस्था, कृषी
उत्पन्न बाजार समिती अशा संस्थांमध्ये नोकरीस प्राधान्य मिळते, तसेच सहकारी संस्थांतील
कर्मचा-यांना सेवानियमातील तरतुदीनुसार वेतनवाढ मिळते. सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी
शासनाकडून प्रसिद्ध होणा-या लेखा परीक्षकांच्या यादीत नाव समाविष्ट होण्यासाठी ही परीक्षा
उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा