विशेष लेखः- गुणकारी दशपर्णी अर्क
खरीप हंगाम तोंडावर आला असून या हंगामातील कापूस , सोयाबीन , तूर , मूग आणि भाजीपाला या पिकांवरील मित्रकिडींचे संरक्षण आणि शत्रू किडींचे निर्मूलन करण्यासाठी दशपर्णी अर्क गुणकारी आहे. दशपर्णी अर्क हे उत्तम प्रतीचे किडनाशक , बुरशीनाशक व टॉनिक म्हणूनही वापरता येते. दशपर्णी अर्क तयार होण्याकरीता ३० दिवसाचा कालावधी लागतो. त्यामुळे खरीप हंगामासाठी दशपर्णी अर्क तयार करण्याची हीच योग्य वेळ आहे. दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत दशपर्णी अर्क तयार करण्याकरीता १० प्रकारच्या वेगवेगळया उग्र वासाच्या वनस्पतीच्या पाल्याचा उपयोग करण्यात येतो. पाणी २०० लिटर , शेण २ किलो , गोमुत्र १० लिटर , हळद पावडर २०० ग्रॅम , अद्रक पेस्ट ५०० ग्रॅम , तंबाखु १ किलो , हिरवी तिखट मिर्ची १ किलो , लसुन १ किलो , करंज पाला २ किलो (लहान फांद्यांसह) , सिताफळ पाला २ किलो , एरंडी पाला २ किलो , पपई पाला २ किलो , कडुलिंब पाला ५ किलो , निरगुडीचा पाला २ किलो , रुईचा पाला २ क...