माहिती अधिकारी पदी रितेश भुयार रुजू

अकोला, दि . ३१ (जिमाका)- येथील जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती अधिकारी (वर्ग-२) या रिक्तपदावर रितेश भुयार यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली असून ते कार्यालयात रुजू झाले आहेत. जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यालयातील माहिती सहायक सतिश बगमारे , दूरमुद्रक चालक सचिन गजभिये , विश्वनाथ मेरकर , गजानन इंगोले , हबीब शेख , मंदार कुलकर्णी आदी उपस्थित होते. रितेश भुयार हे नवी दिल्ली येथील महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र परिचय केंद्र येथे गेली नऊ वर्ष उपसंपादक यापदावर कार्यरत होते. त्यांची पदोन्नतीने माहिती अधिकारी (वर्ग २) या पदावर अकोला येथे नियुक्ती झाली आहे. त्यां नी यापूर्वी दिल्लीत हिंदुस्थान समाचार (वृत्तसंस्था), दै.पुढारी, आकाशवाणी आणि माहिती व नभोवाणी मंत्रालयांतर्गत कार्यरत इलेक्ट्रॉनीक मिडीया मॉनिटरींग सेंटर येथे कार्य केले आहे. तसेच पुणे येथे दै.जनमन, हिंदुस्थान समाचार आणि जनवार्ता ( स्थानिक वृत्त वाहिनी)मध्येही कार्य केले ...