१७६ अहवाल प्राप्तः ५७ पॉझिटीव्ह, एक मयत


अकोला,दि.७(जिमाका)- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १७६ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ११९ अहवाल निगेटीव्ह तर ५७  अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज दुपारनंतर  नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या पाच जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित चौघांना कोविड केअर सेंटर मध्ये निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. दरम्यान काल (दि.६) रात्री एका ८५ वर्षीय रुग्णांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ८१३ झाली आहे. तर आजअखेर २३६ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजपर्यंत एकूण ६१४६ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५८६७, फेरतपासणीचे १११ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १६८ नमुने होते. आजपर्यंत एकूण ६१२० अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ५३०७ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ८१३ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज ५७ पॉझिटिव्ह
आज सकाळी ३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात  १८ महिला व २० पुरुष आहेत. त्यातील आठ जण खदान येथील,चार जण अकोट फ़ैल,चार जण तार फ़ैल, चार जण खडकी, चार जण जिएमसी क्वार्टर येथील तर उर्वरित रजपुतपुरा, अंतरी मलकापूर, हरिहरपेठ, वाशीम रोड, छोटी उमरी नाका, द्वारका नगर मोठी उमरी,गजानन नगर, बापूनगर टेलिफोन कॉलनी, कैलास टेकडी, तपे हनुमान, देशमुख फ़ैल, गायत्रीनगर कौलखेड, ध्रुव अपार्टमेंट जिल्हा स्त्री रुग्णालया समोरआणि नायगाव येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत.
आज  सायंकाळी १९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सहा महिला व १३ पुरुष आहेत. त्यातील  चार जण खदान येथील, तीन जण जठार पेठ येथील  तर उर्वरित  गोरक्षण रोड, कच्ची खोली सिंधी कॅम्प,  अनिकट पोलीस लाईन,  गवळीपुरा, दीपक चौक,  शिवर,  बेलोदे ले आऊट,  चैतन्य नगर,  नायगाव,  संत कबीर नगर,  गुलजार पुरा आणि बाळापूर येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
एक जण मयत
दरम्यान काल(दि.६) रात्री एका ८५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण रजपुतपुरा येथील रहिवासी असून दि.३१मे रोजी त्यास दाखल केले होते, या रुग्णाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णाचा समावेश आजच्या अहवालात करण्यात आला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
नऊ जणांना डिस्चार्ज
तसेच आज दुपारनंतर नऊ जणांना डिस्चार्ज दिला. त्यातील पाच जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित चार जणांना कोविड केअर सेंटर मध्ये  निरीक्षणाखाली  ठेवण्यात आले आहे. त्यात सात महिला तर दोन पुरुष आहेर. त्यातील   देशमुख फैल येथील तीन जण तर  गायत्रीनगर, कमला नगर, देवी खदान,  सिटी कोतवाली जवळ,  सोनटक्के प्लॉट व रामदास पेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.
२३६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत ८१३ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ३७ जण (एक आत्महत्या व ३६ कोरोनामुळे) मयत आहेत. तर आज नऊ जणांना डिस्चार्ज दिला आहे.आता डिस्चार्ज दिलेल्या  एकूण  व्यक्तींची संख्या ५४०  झाली आहे. तर सद्यस्थितीत २३६ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी  दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ