कापूस खरेदी सुटीच्या दिवशीही सुरु


अकोला,दि.१२(जिमाका)-  कापूस खरेदी पूर्ण करावयाची असल्याने  सुटीच्या दिवशीही कापूस खरेदी केंद्र व संबंधित कार्यालये सुरु ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रवीण लोखंडे यांनी कळविले आहे.
यासंदर्भात राज्यस्तरावर निर्णय घेण्यात आला असून  राज्यातील शेतकऱ्यांचा कापूस तात्काळ खरेदी व्हावा यासाठी सुटीच्या दिवशी कापूस खरेदी केंद्र, कृषि उत्पन्न बाजार समित्या,  जिल्हा उपनिबंधक, विभागीय उपनिबंधक, तालुका उपनिबंधक,  पणन संचालक  इ. सर्व संबंधित कार्यालये सुरु राहतील. कापूस खरेदी तात्काळ पूर्ण करण्याच्या दृष्टीने उपाययोजना व्हावी यासाठी ही कार्यालये सुरु ठेवण्यात येणार असून पुढील आदेश येईपर्यंत कार्यालये सुरु राहणार आहेत, असेही डॉ. लोखंडे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ