दुर्धर आजारांनी ग्रस्त लोकांच्या चाचण्या तत्परतेने करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


        अकोला,दि.२२ (जिमाका)- शहरामध्ये कोविड-१९ च्या रुग्ण्याची वाढ होत आहे. महानगरपालिकेकडून घरोघरी सर्वेक्षणाचे काम ९० टक्क्यापर्यंत पूर्ण झाले आहेत. शहरातील सर्वेक्षणामध्ये ज्या रुग्णांमध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशनचे प्रमाण कमी आहे. तसेच ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी, श्वसनाचा त्रास व इतर दुर्धर आजार आहेत,अशा व्यक्तीची यादी तयार करुन त्यांच्यावर निगराणी ठेवून त्यांच्या घशातील स्त्रावांचे नमूने संकलन करण्याचे काम तत्परतेने करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेन्द्र पापळकर यांनी दिले.
            कोरोना संदर्भात  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेन्द्र लोणकर, स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षीका डॉ.आरती कुलवाल, मनपा उपआयुक्त वैभव आवारे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, बाळापूर उपविभागीय अधिकारी रमेश पवार, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, बाळापूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना हाडोळे, तहसिलदार विजय लोखंडे, बाळापूरचे तहसिलदार पी. बी. भुसारी, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य जीवनदायी योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ. आश्विनी खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            शहरात जो नवीन रुग्ण असल्याचे निदर्शनास आला आहे तो व्यक्तीक कोणत्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातून आला आहे? याबाबत अधिक खबरदारीने माहिती घ्यावी. तसेच ही माहिती अद्यावत ठेवावी व प्रशासनाकडे दररोज याबाबत अहवाल सादर करावा. वार्डावार्डात झालेल्या  सर्वेक्षणातून प्राप्त माहितीच्या आधारे व्यक्तींचे घशातील स्त्रावांच्या नमुन्यांचे चाचणीसाठी संकलन करावे. अतिसंवेदनशील रुग्णाकडे विशेष लक्ष द्यावे,अशा सूचना त्यांनी दिल्या.
बाळापूरसाठी ॲक्शन प्लॅन तयार करा
            बाळापूर शहरात कोविड-१९ च्या वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता ॲक्शन लॉन तयार करावा व घरोघरी सर्वेक्षण करुन तपासणीवर अधिक भर द्यावा. बाळापूर येथील खाजगी डॉक्टरांनी आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांची माहिती अद्यावत ठेवून तात्काळ प्रशासनाला किवा ग्रामीण रुग्णालय यांना कळवावी. येत्या काळात कोविड रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेवून प्रशासनाने व आरोग्य विभागाने  रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती, आरोग्य तपासणी संस्थागत अलगीकरण यासाठी सुक्ष्म नियोजन करावे. उच्च जोखमीच्या रुग्णांचे स्वॅब घेवून त्यांना अलगिकरण कक्षात ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ