राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा शिष्यवृत्ती:जिल्ह्यातील २० खेळाडुंना लाभ
अकोला,दि.5 (जिमाका)- भारतीय
शालेय खेळ महासंघ, भोपाळ यांचे वतीने सन
2019-20 या वर्षामध्ये, क्रीडा व
युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
यांच्या वतीने विवीध खेळांच्या
राष्ट्रीय शालेय क्रीडा
स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱ्या व प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या अकोला जिल्ह्यातील २० खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा शिष्यवृत्तीचा लाभ झाला आहे. हा लाभ या
खेळाडुंना थेट बॅंक खात्यात दिला जाणार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी
कळविले आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा शिष्यवृत्तीचे वाटप थेट त्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणारआहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडूस रू. 11250/- व्दितीय
क्रमांक प्राप्त रू.8950 व तृत्तीय क्रमांक
प्राप्त रु.6750/- व सहभागी खेळाडूस रू. 3750/- एवढी शिष्यवृत्ती
देण्यात येते.
पात्र खेळाडूंची नावे याप्रमाणे-
बॉक्सिंग- शास्वत तिवारी,
शेख रेहान शेख उस्मान,नाना धोंडिबा पिसाळ,
सोहेल रमजान पप्पुवाले, राज श्याम तायडे, मो. नदिम मो. अदनान,विधी राकेश रावल,तनिश
संजय बुंदेले, चेतन चंदन अंभोरे, तन्मय
कळंत्रे,
बेसबॉल- मनिष विजय
म्हैसने, आनंद भारत निकोसे, मैथली श्रीकांत सरोदे.
धनुर्विद्या-सुरज किशोर खांजोडे,
थ्रो बॉल- पवन अनिल जाधव,
सॉफ्ट बॉल-परिमल धनराज धर्मे, नेहा भारत अंभोरे,विशाखा रतन
हिरोडे,
कबड्डी-नक्षत्रा गजानन
इंगळे,
हॅण्डबॉल- आदित्य उपेंद्र
खन्नाडे,
या खेळाडूंनी आपले सहभाग/ प्रावीण्य
प्राप्त केलेल्या सन 2019-20 चे राष्ट्रीय
शालेय क्रीडा स्पर्धेचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत, खेळाडुच्या बँक खात्याच्या
पासबुकची झेरॉक्स व आधार कार्ड चे झेरॉक्स
सोमवार दि. 15 पुर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालयात जमा करावी, त्यानंतर त्यांच्या
खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात
येईल, असे जिल्हा क्रीडा
अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा