पालकमंत्री ना. बच्चू कडू मंगळवारी (दि.९) जिल्हादौऱ्यावर


अकोला,दि.८ (जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  हे मंगळवार दि.९ रोजी दुपारी जिल्हादौऱ्यावर येणार आहेत.
त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
मंगळवार दि.९ रोजी दुपारी पावणे दोन वा. शासकीय विश्रामगृह अकोला येथे आगमन,
दुपारी दोन ते तीन  कोविड-१९ बाबत बैठक,
दुपारी तीन ते चार वा.अकोट -तेल्हारा,  देवरी- शेगाव, अकोला-अकोट या रस्त्यांच्या कामांबाबत आढावा बैठक, 
दुपारी चार ते पाच वा.  घरकूल योजनेबाबत आढावा बैठक,
सायं.पाच ते दहा वा. जिल्हा नियोजन समितीमार्फत विविध विकास कामांकरीता पुरविण्यात आलेल्या निधीबाबत आढावा,
सायं. सहा ते सात आयएमए या वैद्यकीय  क्षेत्रातील संस्थेच्या सभासदांसमवेत चर्चा.
या सर्व बैठका ह्या जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहेत.
त्यानंतर सायं. सात वा. शासकीय विश्रामगृहाकडे रवाना.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ