संपर्क तपासणी व अलगणीकरणाचे तंतोतंत पालन करा-मनपाच्या प्रभाग अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


अकोला,दि.६ (जिमाका)-  पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर  त्या रुग्णाच्या संपर्क तपासणी  व संपर्कात आलेल्या व्यक्तिंचे पूर्णतः अलगीकरण- विलगीकरणाबाबत शासनाने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज महानगरपालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांना दिले.
                        यासंदर्भात आज मनपाच्या प्रभाग अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बोलावण्यात आली होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,  मनपा उपायुक्त आवारे, डॉ. पाठक व सर्व प्रभाग अधिकारी उपस्थित होते.
                        महापालिकेचे प्रभाग अधिकारी व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांकडे त्या त्या भागातील रुग्णांचे संपर्क तपासणी    गृह अलगीकरणात ठेवण्यात आलेल्या रुग्णांचे दैनंदिन निरीक्षणाची जबाबदारी आहे. त्याअनुषंगाने कोणत्याही रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह अहवाल आल्यानंतर त्या रुग्णाच्या निकट संपर्कातील व त्याच्या दूरस्थ संपर्कातील व्यक्तिंचा त्याच दिवशी शोध घ्यावा. निकट संपर्कातील व्यक्तिंना संस्थागत अलगीकरणात व लक्षणे दिसत असल्यास तपासणीसाठी न्यावे. दूरस्थ संपर्कातील व्यक्तिंचे गृह अलगीकरण करण्यात यावे.  त्यांचे दैनंदिन निरीक्षण ठेवून त्यांच्यात लक्षणे वाढत आहेत की नाही याबाबत तात्काळ आरोग्य यंत्रणेस कळवावे, असे निर्देश दिले.  तसेच अकोला महानगरपालिका हद्दीत घरोघरी होत असलेल्या आरोग्य तपासणी  मोहिमेत पल्स ऑक्सिमिटरचा वापर करावा. ज्येष्ठ नागरिक व अन्य आजारांच्या व्यक्तिंची विशेषत्वाने लक्ष ठेवावे. ही आरोग्य तपासणी लवकरात लवकर पूर्ण करावी असे निर्देशही यावेळी जिल्हाधिकारी  पापळकर यांनी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ