पशुपालकांना अर्ज करण्याचे आवाहन


अकोला, दि. २२- गाई- म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा लाभ सन २०२०-२१ करीता घेण्यासाठी पशुपालकांनी दि.१५ जुलै पर्यंत आपल्या नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधून जातिवंत गाई व म्हशींचे अर्ज भरुन घ्यावेत. जास्तीत-जास्त पशुपालकांनी या योजनेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. तुषार पांडुरंग बावणे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ