दूर्धर आजारग्रस्तांची बुधवारपासून (दि.१ जुलै) मोफत तपासणी मोहिम


            अकोला,दि.२९(जिमाका)-अकोला शहरातील कोरोनाग्रस्तांचा वाढता संसर्ग बघता दूर्धर आजारग्रस्‍त रुग्‍णांवर विशेष लक्ष ठेवण्याची आवश्यकता लक्षात घेऊन जिल्‍हाप्रशासन, मनपा प्रशासन तसेच अकोला शहरातील डॉक्‍टर संघटना(NIMA IPA) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने बुधवार दि. ते जुलै दरम्‍यान विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत विनामूल्य तपासणी केली जाणार आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे की, ज्या रुग्णांना अन्य व्याधी आहेत त्यांची या मोहिमेत तपासणी केली जाणार आहे. तसेच त्‍यांना कोरोना विषाणूची लक्षणे दिसल्‍यास त्‍यांना तात्‍काळ भरती करणे व तसेच त्‍यांना सध्‍यस्थितीत जे आजार आहेत त्‍या आजारांवर नियमितपणे औषधे घेत आहेत किंवा नाही याची खात्री करणे यासाठी ही विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. बुधवार दि.१ ते शनिवार दि.४ जुलै दरम्यान  सकाळी ते १० या वेळेमध्‍ये आरोग्‍य तपासणी सहभागी डॉक्‍टरांच्या दवाखान्यात केली जाईल.
या करीता मनपा उपायुक्त वैभव आवारे ह मनपा प्रशासनाचे, महसूल प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार,  परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी श्रीमती तेजस्वी कोरे, शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे  जिल्हा समन्वयक गजानन महल्ले व सहाय्यक स्वप्निल ओळंबे हे काम पाहणार आहेत.
तसेच जीपीए चे अध्यक्ष डॉ. सुनिल बिहाडे, सचिव डॉ. संदीप चव्हाण, सहसचिव लुल्ला, डॉ. राजेश देशमुख, निमा च्या अध्यक्ष डॉ. ज्योती कोकाटे. सचिव डॉ. मनोहर घुगे यांचा विशेष सहभाग राहणार आहे. या मोहिमेत अकोला शहरातील २० प्रभागामध्‍ये तज्ज्ञ जनरल प्रॅक्‍टीनर डॉक्‍टर आपली विनामूल्‍य सेवा देणार असून ज्या रुग्णांना मधुमेह, रक्तदाब, क्षयरोग, कर्करोग यासारखे आजार  असतील अशा रुग्णांची तपासणी व माहिती संकलन होणार आहे. नागरिकांनी या विशेष तपासणी मोहिमेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ