पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा


अकोला,दि.१५(जिमाका)-राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे मंगळवार दि.१६ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
मंगळवार दि.१६ रोजी-
सकाळी दहा वा. राजनापूर खिनखिनी येथे आगमन व बैठकीस उपस्थिती. कृतीआराखड्यानुसार आढावा व चर्चा.
दुपारी १२ वा. बोरगाव मंजूकडे प्रयाण,
दुपारी साडेबारा वा.  बोरगाव मंजू येथील लघु उद्योग केंद्रास भेट,
दुपारी पाऊण वा.  बोरगाव मंजू येथून वाशिंबा कडे प्रयाण, 
दुपारी एक वाजता वाशिंबा येथील  अगरबत्ती उद्योग केंद्रास भेट,
दुपारी सव्वा वा. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोलाकडे रवाना, 
दुपारी दोन ते चार यावेळात पीकेव्ही अकोला येथील कमिटी सभागृहात बैठकीस उपस्थिती, 
दुपारी सव्वा चार वा. विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवक , सदस्य तसेच विचारवंत यांचे समवेत व्हिजन अकोला बाबत बैठक, ठिकाण- नेहरु पार्क सभागृह अकोला.
सायंकाळी पावणे सहा वा.  कोविड १९  व पिक कर्ज वाटप बाबत आढावा बैठक, ठिकाण- नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला.
त्यानंतर सवडीने विश्रामगृहाकडे प्रयाण.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ