१९० अहवाल प्राप्तः ५९ पॉझिटीव्ह, एक मयत

अकोला,दि.१२(जिमाका)- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १९० अहवाल प्राप्त झाले. त्यातील १३१ अहवाल निगेटीव्ह तर ५९ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान आज एका रुग्णांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ९७३ झाली आहे. आजअखेर ३२३ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी  दिली आहे.
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजपर्यंत एकूण ७१२१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ६८२२, फेरतपासणीचे ११५ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १८४ नमुने होते. आजपर्यंत एकूण ७०५८ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ६०८५ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ९७३ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज ५९ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात ५९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी प्राप्त अहवालात २२ महिला व २७ पुरुषांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.  त्यात पूरपिडीत कॉलनी येथील नऊ,  अकोट फैल येथील सात,  शिवर येथील चार, बाळापूर येथील तीन,  मोठी उमरी येथील तीन,  खदान येथील तीन,  रेल्वे क्वार्टर येथिल तीन,  गुलजार पुरा येथील तीन,  सिंधी कॅम्प येथील दोन,  पातूर येथील दोन, जुने शहर येथील दोन, तर  तारफैल, संतोषीमाता मंदिर जवळ,  छोटी उमरी,  गितानगर,  विजय नगर, शंकर नगर,  भगतवाडी डाबकी रोड, टेलिफोन कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
आज सायंकाळी प्राप्त अहवालात १० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एका दोन महिने वयाच्या  बालिकेसह नऊ महिला व एक पुरुष रुग्णाचा समावेश आहे.  त्यातील पाच जण हे रंगारहट्टी बाळापुर येथील रहिवासी आहेत. उर्वरीत  बाळापुर, सिंदखेड ता. बार्शी टाकळी,  विजयनगर, हमजा प्लॉट,  चैतन्य नगर येथील रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
एक मयत
दरम्यान काल (दि.११) रात्री एका ७८ वर्षीय पुरुष रुग्णाचे उपचार घेतांना निधन झाले. हा रुग्ण बाळापूर येथील रहिवासी होता. त्यास दि. ७ जून रोजी दाखल करण्यात आले होते.
२९ जणांना डिस्चार्ज
दरम्यान काल (दि.११) सायंकाळनंतर नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यातील चार कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित पाच जणांना घरी सोडण्यात आले. त्यात पाच महिला व दोन पुरुष आहेत. त्यातील दोघे गायत्रीनगर येथील तर अकोट फैल, गुलशन कॉलनी, हिंगणाफाटा, रामदास पेठ, हरिहर पेठ, सिंधी कॅम्प व खदान येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान आज दुपारनंतर २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला . त्यात ११ जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित  नऊ जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यात १५ पुरुष तर पाच महिला रुग्ण आहेत. त्यातील पाच जण खदान येथील, तीन जण माळीपुरा येथील, तर कैलाश टेकडी , व्यकंटेश नगर, संत कबीर नगर, गुलजार पुरा, सिंधी कॅम्प, टॉवर चौक, रामदास पेठ, मलकापुर, तेलीपुरा, जठारपेठ, सिटी कोतवाली, शिवसेना वसाहते येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
३२३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत ९७३ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ४४ जण (एक आत्महत्या व ४३ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या  एकूण  व्यक्तींची संख्या ६०६  आहे. तर सद्यस्थितीत ३२३ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी  दिली आहे.अशी माहिती  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी  दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ