आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्र सुरु करण्यास सशर्त परवानगी


अकोला,दि.१२(जिमाका)-    कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जारी असलेल्या लॉक डाऊनच्या कालावधीत  प्रतिबंधात्मक क्षेत्र वगळून  आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्र सुरु करण्यास  परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.  सोशल डिस्टन्सिंग व केंद्र आणि सयंत्रांचे निर्जंतूकीकरण करणे, आलेल्या प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग करणे  त्यांच्या नोंदी ठेवणे इ. व अन्य कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या शर्तींसह ही परवानगी देत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा