अतिवृष्टीचा इशारा; क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी थांबण्याचे निर्देश
अकोला,दि.२ (जिमाका)- हवामान विभाग नागपूर यांनी दिलेल्या संदेशानुसार
विदर्भातील सर्व जिल्ह्यात दि.२ ते ५ जून
पर्यंत अतिवृष्टी, वादळ, गारपीट, वीज
कोसळणे इ. नैसर्गिक आपत्तींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तरी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, मंडळ
अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक, आरोग्य विभागाचे कर्मचारी व अन्य क्षेत्रिय कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयी
उपस्थित रहावे असे निर्देश जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा