१३८ अहवाल प्राप्तः ३० पॉझिटीव्ह, एक मयत


अकोला,दि.११(जिमाका)- आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १३८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १०८ अहवाल निगेटीव्ह तर ३०  अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान आज एका रुग्णांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ९१४ झाली आहे. आजअखेर २९४ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी  दिली आहे.
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजपर्यंत एकूण ६९५२ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ६६६०, फेरतपासणीचे ११२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १८० नमुने होते. आजपर्यंत एकूण ६८६८ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ५९५४ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ९१४ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज ३० पॉझिटिव्ह
आज सकाळच्या अहवालात २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.  त्यात १० महिला व १८ पुरुष आहेत. त्यातील पाच जण आदर्श कॉलनी, तीन जण खदान, दोन जण तार फैल, दोन जण इंदिरा नगर वाडेगाव,  दोन्जण सिंधी कॅम्प येथील तर उर्वरित  दसेरानगर, गुलजार पुरा,  दगडीपूल,  मोहता मिल,  अकोट फैल,  जीएमसी क्वार्टर,  गंगानगर, बंजारानगर, उमरी, शेलार फैल गुरुद्वारा पेठ जवळ,  नेहरु नगर डाबकी रोड, गुलशन कॉलनी,  टॉवररोड, जुने शहर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात  एका पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. त्यातील एक मोहता मिळ रोड व एक जुने शहर येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
एक मयत
दरम्यान काल (दि.१०) रात्री उपचार घेतांना  एका ७६ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. हा इसम हरिहरपेठ येथील रहिवासी आहे. हा इसम दि. ३ जून रोजी दाखल झाला होता,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
२९४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत ९१४ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ४३ जण (एक आत्महत्या व ४२ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या  एकूण  व्यक्तींची संख्या ५७७  आहे. तर सद्यस्थितीत २९४ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी  दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ